नाशिक : प्रतिनिधी
येथील धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्था संचलित धम्मगिरी योग महाविद्यालय येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) च्या समितीने भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
या समितीत प्रा. राजेंद्र जैन, सुमित कठाळे, चेतन पेलने यांचा समावेश होता. यावेळी अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डॉ. पल्लवी जाधव, डॉ. विशाल जाधव, प्रा. राज सिन्नरकर, डाॅ. अजय पुरीवार, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, उपप्राचार्य राजेंद्र काळे, प्रा. तस्मिना शेख, सुनिता पाटील, प्रा. संध्या सोमय्या, प्रा. तुषार विसपुते, योगशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, प्रा. पुरुषोत्तम सावंत, नारायण सूर्वे वाचनालय व मायको फोरमचे राजू नाईक, योगशिक्षक डाॅ. सतीष वाघमारे, डाॅ. विद्या वाघमारे, रंजना पाटील, प्रा. शिवाजी खोपे, कायदेविषयक सल्लागार ॲड. शरद जाधव, कीर्ती शिर्के आदी उपस्थित होते.
—