नाशिक : प्रतिनिधी
धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था, नाशिक संचलित धम्मगिरी योग महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. जिवराम गावले महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा मायकोचे सेवानिवृत्त कर्मचारी जिवराम गावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. नितिन रावते, डॉ. तस्मिना शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धम्मगिरी योग महाविद्यालयाचे मार्गदर्शक व अत्तदीप मेडिकोज सोशल वेल्फेअर असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले. प्राचार्य यु. के. अहिरे यांनी महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि महती याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. राजेंद्र काळे यांनी योग विषयाचे महत्व विषद केले. धम्मगिरी योग महाविद्यालच्या समन्व्यक व जेष्ठ्य सामाजिक कार्यकर्त्या गीता गायकवाड यांनी महाविद्यालयाच्यावतीने आभार मानले. महाविद्यालयाचे काशीफ शेख, हर्षल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.
—