नाशिक : प्रतिनिधी
रामटेक (नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातंर्गत येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात एम. ए. (योगशास्त्र) च्या पहिल्या सत्र परीक्षेतंर्गत शेवटचा म्हणजे चौथा पेपर, योग संप्रदाय या विषयाची परीक्षा सुरळीत पार पडली.
परीक्षा व्यस्थापनाकामी केंद्र संचालक तथा प्राचार्य यु. के. अहिरे यांच्या नियंत्रणाखाली पर्यवेक्षक कल्याणी ढाकेफळे व सह पर्यवेक्षक प्रा. चैतन्य कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. संस्था मार्गदर्शक डाॅ. विशाल जाधव व संस्था अध्यक्ष कैलास जाधव, योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते हे व्यवस्थापनात सहकार्य करत होते.
—