नाशिक : प्रतिनिधी
रामटेक (नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातंर्गत येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात एम. ए. (योगशास्त्र) च्या पहिल्या सत्र परीक्षेतंर्गत भारतीय तत्वज्ञान या विषयाचा पेपर संपन्न झाला. परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आठ फेब्रुवारीला परीक्षा समाप्त होणार आहे.
धम्मगिरी योग महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्र संचालक यु. के. अहिरे, प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते, प्रा. प्रीती चांदोरकर, कार्यालयीन कर्मचारी काशिफ शेख या सर्वांनी परीक्षेच्या कामी व्यवस्था पाहिली.
—