दूरदृष्टी विकसीत होण्यासाठी विद्यार्थांनी योग करावा : प्रा. राज सिन्नरकर

0

नाशिक : प्रतिनिधी
विद्यार्थांनी भविष्यात आपल्याला कोण बनायचे आहे, हे आत्ताच ठरवून, त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी योग करावा. त्यामुळे आपल्यात दूरदृष्टी विकसीत होऊन ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी प्रयत्नशील राहता येईल, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर यांनी व्यक्त केले.

धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे वडाळा येथील केबीएच विद्यालयात योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा प्रा. सिन्नरकर बोलत होते. याप्रसंगी धम्मगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश मोहुर्ले व केबीएच विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हसकर उपस्थित होते.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, स्वतःला घडविण्यासाठी स्वतःचाच अभ्यास करायचा असतो. योग केल्याने हा अभ्यास कसा करायचा हे समजते. योगाभ्यासाने आपली एकाग्रता वाढते, शिस्त निर्माण होते, एकूणातच अभ्यास करण्याची क्षमता वाढते.
प्राचार्य मोहुर्ले यांनी वातावरणात ऑक्सिजन वाढण्यासाठी वृक्षारोपणाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होता.

डाॅ. विशाल जाधव यांच्याविषयी गौरवोद्गार
केबीएच विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डाॅ. विशाल जाधव यांच्याविषयी प्रा. सिन्नरकर यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, डाॅ. जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले. त्यांच्याप्रमाणेच आपण विद्यार्थीही यश संपादन करू शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.