नाशिक : प्रतिनिधी
जीवनात मनाविरुद्ध घडले तर काय करायचे हे योगाभ्यासाने कळते. परिस्थितीसमोर मी लाचार होणार नाही. समाधान व स्वाभिमानाने राहील, हे योगशास्त्र शिकवते. योग हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे. योगशास्त्र सोबत असेल तर जीवन सामर्थ्याने जगता येईल, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
येथील धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्था संचलित धम्मगिरी योग महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ व गुणवंतांचा सत्कार झाला. याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगाचार्य गोकुळ घुगे, मिलिंद गणकर, डाॅ. काजल पटणी, डाॅ. संजय जाधव, डाॅ. श्रीकांत खरे, प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, यू. के. अहिरे, अशोक पाटील, मोहन चकोर, संजय कुऱ्हे, बाळासाहेब मोकळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे होते.
या कार्यक्रमाचे आयोजक संस्था अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डाॅ. पल्लवी जाधव, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र काळे, तर मार्गदर्शक डाॅ. विशाल जाधव, समन्वयक गीता गायकवाड हे होते.
या कार्यक्रमास मायको एम्प्लॉईज फोरम, अत्त दीप भव, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, मेडीकोज सोशल वेल्फेअर असोसिएशन, जिवक नर्सिंग महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय (मायको हाॅल), सिंहस्थनगर येथे झाला. याप्रसंगी धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच योगशिक्षक राजेंद्र जाधव, दिलीप देसले, विलास लोखंडे, सदाशिव इंगळे, मनोज दिंडे आदींचा सत्कार करण्यात आला.
डाॅ. विशाल जाधव म्हणाले की, कोरोना काळात योगशास्त्राने बहुमोल कामगिरी केली आहे. ही योगगंगा घरोघरी पोहचली तर आपण अडचणींना समर्थपणे तोंड देऊ शकतो.
डाॅ. सतीश वाघमारे व डाॅ. विद्या वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डाॅ. पराग पटणी, राजू नाईक, प्रा. शिवाजी खोपे, महेश घोलप, रंजना पाटील, सीमा पाठक, किर्ती शिर्के, आरती आठवले, काजल गवई आदींसह मोठ्या संख्येने योगप्रेमी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी असे :
हर्षदा घरटे, पल्लवी जाधव, अंबादास कडलग, सखाराम मोरे, सिद्धांती सूर्यवंशी, चंद्रमणी पटाईत, वैष्णवी कुर्हे, हेमंत सूर्यवंशी, सतीश डोंगरे, प्रमिला पवार, साक्षी खरे, विलास लोखंडे, सचिन अंभपे, किरण लोखंडे, भारत बुकाणे, किर्ती शिर्के,आरती आठवले.
—