धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा, नृत्य, योगविषयक व्याख्यानाने स्वातंत्र्यदिन साजरा

0

प्रतिनिधी : नाशिक
धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील 15 ऑगस्ट विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण, ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा, भारतमातेचा जयजयकार, नृत्य, योगविषयक व्याख्यान झाले.

मान्यवरांची उपस्थिती

अश्विननगरमधील धम्मगिरी योग महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, काँग्रेसचे पदाधिकारी धोंडीराम आव्हाड, ज्येष्ठ्य योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर, डाॅ. विशाल जाधव, धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सचिव डाॅ. पल्लवी जाधव, संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते व प्रा. चैतन्य कुलकर्णी, डाॅ. सचिन पाटील, प्रिती चांदोरकर, कल्याणी ढाकेफळे, ॲड. शरद जाधव, डाॅ. विद्या वाघमारे, रंजना पाटील, आरती आठवले आदी उपस्थित होते. किरण नगराळे यांनी गीतगायन केले.

जयजयकाराने परिसर दुमदुमला

धम्मगिरी महाविद्यालयातर्फे ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थी तिरंगा ध्वज घेऊन सामील झाले होते. भारतमातेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी वाद्याच्या तालावर सर्वांनीच नृत्य केले. मायको फोरम एम्प्लॉईजच्या सभागृहाजवळ पदयात्रेची सांगता झाली.

घरघर तिरंगा, घरघर योगगंगा

मायको फोरम एम्प्लॉईजच्या सभागृहात प्रा. राज सिन्नरकर यांचे घरघर तिरंगा, घरघर योगगंगा या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर फोरमचे अध्यक्ष संजय कुर्हे, विश्वस्त किशोर वाणी, सचिव अविनाश दशपुते, सुधीर गोसावी, अश्पाक कागदी, सुधाकर सोनवणे, हरिष काळे, योगशिक्षक राजेंद्र काळे उपस्थित होते.

योगाने जीवन समृद्ध व आनंदी
    प्रा. सिन्नरकर म्हणाले की, मनाची शक्ती विखुरलेली असते. ती योगशास्त्राने एकत्रित केली जाते. साहजिकच मन सामर्थ्यवान होते. योगाने जीवन समृद्ध व आनंदी होईल. योगाचा अवलंब करीत असलेली व्यक्ती घाबरत नाही. त्यामुळे आपण आपले जीवन योगाच्या सहाय्याने बदलवूच शिवाय नंतर भेटेल त्याचे जीवन योगाच्या आधारे बदलू या.
लोकमान्य टिळक, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तीनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली, म्हणूनच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असल्याची कृतज्ञता प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.

यावेळी स्वाती सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डाॅ. विशाल जाधव यांचा प्रा. सिन्नरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.