म्हसरूळ : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक 1 मधील स्नेहनगर येथे महिलांसाठी हळदी – कुंकू, तसेच स्नेहनगर, इच्छामणी गणपती मंदिर व स्नेह नगर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना पेलमहाले यांच्या `प्रभाग क्रमांक 1 हा सीसीटीव्ही कॅमेरायुक्त’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
म्हसरूळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या हस्ते कॅमेरा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी साखरे यांनी महिलांसाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने मार्गदर्शन केले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिका 2022 निवडणुकीला सामोरे जातांना मी काय करेल ? यापेक्षा मी काय केले आहे, हे सांगायला मला जास्त आवडेल. म्हणूनच आजपर्यंत आपण जी लोकोपयोगी कामे केली आहे आणि करतो आहेत. त्याचा लेखाजोखा घेऊन मी आपणा सर्वांसमोर येत आहे.
– गणेश किसनराव पेलमहाले
– गणेश किसनराव पेलमहाले