नाशिकरोड : सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल शनिवारी वसंत सोशल फाऊंडेशनतर्फे 2021 देण्यात आलेल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार कोंडाजीमामा आव्हाड यांच्या हस्ते स्वीकारताना युवा समाजसेवक दत्ता सानप. समवेत वसंत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप.
—
म्हसरुळ, (वा.)
सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय सेवेबद्दल वसंत सोशल फाऊंडेशनचा 2021 साठीचा क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार युवा समाजसेवक दत्ता सानप यांना कोंडाजीमामा आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आला.
नाशिकरोड येथे झालेल्या ह्दय सत्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या 28 समाजसेवकांचा पुरस्काराद्वारे सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण न्यासाच्या प्रदेशाध्यक्षा तनुजाताई भोईर ( घोलप), धर्मसेवक सोन्यादादा पाटील आणि वसंत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप हे मान्यवर उपस्थित होते.
नाशिकरोड : सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल शनिवारी वसंत सोशल फाऊंडेशनतर्फे 2021 साठी देण्यात आलेल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मार्थींसह कोंडाजीमामा आव्हाड, धर्मसेवक सोन्यादादा पाटील आणि वसंत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप, समाजकल्याण न्यासाच्या प्रदेशाध्यक्षा तनुजाताई भोईर (घोलप) आदी.
कोंडाजीमामांकडून कौतुक
सत्कार सोहळ्यातील भाषणप्रसंगी कोंडाजीमामा आव्हाड यांनी दत्ता सानप यांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात त्यांनी म्हसरुळ, मखमलाबाद परिसरात केलेली मदत ही खरोखर इतरांना प्रेरणा देणारी होती, अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
—