पोटदुखी
दुखणे काय आहे. दुखणे हा रोग किंवा आजार नसून ते रोगाचे लक्षण असते. शरीरात कोठेही दुखत असेल किंवा वेदना असतील तर प्रकृती आपणास संकेत देऊन त्या भागात काहीतरी गडबड असल्याचे सूचित करते. पोटात ज्या-ज्या वेळी दुखत असेल त्या वेळी अन्न ग्रहण थांबवावे.
लक्षणे
अमाशय किंवा जठरात जखम आतील बाजूस असते. त्यामुळे मंद वेदना सुरू असतात. थुंकीतून रक्त येणे, रक्ताची उलटी होणे, पोटात अति आग होणे, शौचेतून रक्त जाने इ.अशक्तपणा येणे, भीती वाटणे, जेवणाअगोदर भूक लागते. त्यावेळी दुखण्याचे प्रमाण अधिक असते. या विकारास अल्सर असेही म्हटले जाते. चक्कर येणे, डोळ्यास अंधारी येणे, डोक्यास मुंग्या येणे इ.
कारण
पोट दुखीचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही अशी :
1) आतड्याला आलेली सूज किंवा आतड्यात झालेली इजा, घाव जखम.
2) पाचन संस्थेला यकृत ज्या ठिकाणी जोडले त्या ठिकाणी जळजळणे, ज्वलन इ.
3) पोट किंवा आतड्यात मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण होणे.
4) आम्लपित्ताचा त्रास होणे.
5) अपचन, अजीर्ण, अन्न अर्धे कच्चे चावून खाणे, अति प्रमाणात खाणे, वारंवार भूक नसताना खाणे, झोप किंवा पुरेशी विश्रांती न घेणे.
योगोपचार
आसन- शवासन
प्राणायाम- दीर्घ श्वसन
ध्यान
प्रणव ॐ कार साधना
निसर्गोपचार – ताजे थंड धारोष्ण दुध, दिवसभरात कमीत कमी दोन लिटर दुध थोडे थोडे करून प्यावे. संत्री-मोसंबी ज्यूस घ्यावा. हळूहळू फळांचा रस घ्यावा. रोग जसाजसा बरा होऊ लागेल, तस-तसे योग व निसर्गोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्राकृतिक आहार घ्यावा. मठ्ठा, ताजे ताक प्यावे, एनिमा, एप्सम साल्ट बाथ घ्यावे. गरम व थंड कटिस्नान घ्यावे.
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८
—