जुलाब
अहितकारक भोजन ग्रहण करणे व भोजनासंबंधी नियमांचे पालन न करणे, वातावरण बदलने, थंडी, पावसाळा यामध्ये शरीरात विजातीय द्रव्य एकत्र येऊन जुलाब सुरू होतात. दूषित पाणी, दूषित अन्न, किंवा स्वच्छते अभावी जुलाब होत असतात. त्यामध्ये पातळ जुलाब होणे, जुलाबात कळ मारून येणे, पोटात गडगड आवाज होणे व विद्राव्य घटक बाहेर त्यागणे. दुर्गंधीयुक्त जुलाब होणे, शरीरात पाणी कमी होणे, वारंवार अर्ध्या एक तासाच्या अंतराने शौचास होणे यास जुलाब म्हणतात.
लक्षणे
पोटात गाठ मारल्यासारखी वेदना होणे, पोटात गडगड आवाज येणे, शौचेचा असह्य असा आवेग येणे, पुन्हा पुन्हा शौचेची इच्छा उत्पन्न होणे. शरीरात थकवा व अशक्तपणा वाटणे, कंबर दुखणे.
कारण
दूषित अन्न खाणे, अपचन होणे, दूषित पाणी पिणे, हात-पाय शरीर न स्वच्छता ठेवणे, अतितिखट किंवा वातुळ उदा. मोड आलेली मटकी, भिजवलेले चणे, शेंगदाणे किंवा ओल्या भुईमूग शेंगा अर्ध्या-कच्च्या जास्त न चावता खाणे, अति आंबे खाणे किंवा पपई क्षमतेपेक्षा जास्त खाणे, यामुळे जुलाब होत असतात. प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध वागल्याने हा त्रास होतो.
योगोपचार
1. योगनिद्रा
2. आसन- शवासन
3. प्राणायाम- दीर्घश्वसन
4. प्रणव ॐ कार साधना
निसर्गोपचार– निसर्गोपचारात जुलाबावर खालील उपचार करणे आवश्यक आहे.
1. दह्यामध्ये पाणी टाकून त्याचे ताक बनवून वारंवार घ्यावे.
2. सैंधव मीठ, जिरे, धने व हिंग यांचे चूर्ण करून ताकासोबत घ्यावे.
3. सैंधव मीठ व साखर याचे सरबत घ्यावे.
4. सफरचंद उघडून खाल्ल्याने वरील उपायांनी जुलाब थांबतात.
5. अननसाचा उपयोग करणे लाभदायी आहे
6. या विकारात कटिस्नान उपयुक्त आहे. तसेच गरम फूट बाथ घेणे.
वर्ज– तिखट, आंबट, अपथ्यकारक भोजन घेऊ नये. धूम्रपान करू नये, दूषित पाणी पिऊ नये.
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल: rajendrawaman@rediffmail.coमोबाईल नंबर:९८२२४५०७६८
—