पाठदुखी
पाठदुखी हा सर्वसामान्य असा आजार आहे. हा शारीरिक स्वरुपात मोडतो. हा दीर्घ काळ टिकणारा, साथ देणारा, खात्रीशीर असा आजार आहे. पाठदुखी ही सौम्य किंवा तीव्र, अतितीव्र स्वरुपाची असते. पाठीचा मनका व मणक्यातील गादी इतरत्र सरकल्यामुळे किंवा मणक्यातून बाहेर आल्यास नर्व वर टेकते. पर्यायाने तंत्रिका तंत्रानुसार वेदना इतर स्नायूंना होतात. पाठीच्या मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू दुखतात व कधीकधी मणक्याजवळ हर्निया होणे, मणक्याला भेगा पडणे, मणक्याचा आकार बिघडणे, यामुळे पाठदुखी सुरु होते.
लक्षणे –
पाठीच्या जागेवर ज्या ठिकाणी वेदना आहे. तेथे आग होणे, स्नायू ओढून धरल्यासारखा वाटणे, स्नायूला सूज येणे, स्नायू बधीर होणे, स्नायूला झीन-झीन्या येणे. स्नायू अचानक आकुंचन पावणे, ओढून धरणे, स्नायू अडकणे, स्नायू कडक होणे, स्नायूंना ताठरता येणे, यामुळे वेदना कमी, मध्यम, जास्त व तीव्र स्वरूपाच्या असतात.
कारण –
मज्जातंतुच्या मुळांचे आकुंचन व प्रसरण न होणे, दोन मणक्यातील चकती सरकणे, मणक्याला भेगा पडणे, मणक्याच्या जवळच्या स्नायूंना हर्निया होणे, मणक्याला जोराचा मार लागणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, उभे राहणे, चालणे, मोटरसायकलवर चुकीच्या पवित्र्यात बसणे, चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग करणे, अति बोजाची कामे दीर्घकाळ करणे, चुकीच्या पद्धतीने पुढे झुकणे, वाकणे, चुकीचे जीवनशैली ही पाठीच्या मणक्या संदर्भातील पाठदुखी आहे.
परंतु पाठदुखीचे अनेक वेगवेगळे कारणे देखील आहे.
१) मानसिक ताण तणाव
२) वयपरत्वे होणारे हाडांचे आजार
३) रोग प्रतिकारक शक्ती नसणे
४) मूत्रपिंडाची खराबी
५) मुतखडा
६) स्त्रियांमधील मासिक पाळीच्या तक्रारी
७) मूत्रपिंड गर्भाशय इ. ठिकाणी आलेली गाठ
वरील संभाव्य कारणामुळे तीव्र स्वरूपात पाठदुखी हा आजार जडतो. रुग्ण अगदी यामध्ये गडबडा सुद्धा लोळतो. या व्यतिरिक्त अतिआहार, अतिझोप यामुळेही पाठदुखी जडते. मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही, चुकीच्या पद्धतीने पाहणे व हाताळणे यामुळे पाठदुखी हा विकार जडतो.
उपचार-
पाठीचा विकारात शस्त्रक्रिया हा अंतिम उपचार आहे. फिजिओथेरपीनुसार विशिष्ट प्रकारचे प्रकारचे व्यायाम प्रकार अवलंबणे आवश्यक आहे. व्यायाम व ट्रॅक्शन तान देणे महत्त्वाचे आहे. पाठदुखी ही तीव्र आणि दीर्घकालीन असल्याने स्वतः रुग्णांनी काळजी घेतल्यास व योग्य आराम आणि उपचार घेतल्यास बरी होते.
योगोपचार–
सूर्यनमस्कार– सूर्यनमस्कार स्नायू शिथिल करण्यासाठी दररोज करणे आवश्यक आहे.
आसन-
उभ्या स्थितीत – ताडासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन, कोणासन, उत्कटासन, गरुडासन
बैठा स्थितीत– वज्रासन, पद्मासन, वक्रासन, अर्ध मत्सेंद्रासन,उष्ट्रासन,पर्वतासन, उत्तान मंडूकासन, आकर्ण धनुरासन
पाठीवरील आसन– अर्धहलासन, पवनमुक्तासन, विपरीत करणी.
पोटावरील आसन– शलभासन,धनुरासन,भुजंगासन,सर्पासन तीन वेळेस करावे.
क्रिया- कपालभाती, वमन
प्राणायाम– नाडीशोधन, सूर्यभेदन, भस्रिका, उज्जायी यांचा अभ्यास करावा.
ध्यानधारणा– प्रणव ओंकार उच्चारण करावे.
मुद्रा- सिंहमुद्रा ,योगमुद्रा
निसर्गोपचार–
1) गरम उष्ण शेख व मालिश यामुळे रक्त प्रवाहाची गती वाढते आणि खडक झालेली स्नायू शिथील होतात.
2) थंड गरम पाणीपट्टी ठेवावी.
3) टब-बाथ, स्पाइनल बाथ, स्टीम बाथ.
4) पौष्टिक व निरोगी आहार खनिजे व जीवनसत्वयुक्त अन्न घ्यावे.
5) पौष्टिक पदार्थ तुमची हाडे निरोगी ठेवतात. दूध, दही, अंडी, कॅल्शियमयुक्त अन्न.
6) गाजर, काकडी, भोपळा, आवळा, बीट, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य आहारात असावी.
7) अधून मधून उपवास करावा. एनिमा, शंख प्रक्षालन, वमन करावे. वात-पित्त-कफ संतुलन साधावे.
वर्ज-
१) धूम्रपान सोडावे यामुळे येणारा खोकला पाठदुखी वाढवितो.
२) रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो.
३) अल्कोहोल वर्ज करावे.
४) चुकीचे बसणे, वाकणे, उठणे, उचलणे, चालणे, उड्या मारणे, कष्टदायक कामे इत्यादी टाळावीत.
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई–मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर: ९८२२४५०७६८
—