महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबविले

0

नाशिक :  शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला प्रमोद पवार (रा. हरिसंकुल फेज 02, नारायणनगर शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सरला पवार या सोमवारी (दि. १५) रात्री नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अशोका मार्गावरील फोर्टीन एक्स जिम समोरून त्या पायी जात असताना अचानक बोळीतून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ३२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.