नाशिक : प्रतिनिधी
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्यावतीने नाशिक जिल्हाध्यक्ष मनिषा पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट सामाजिक काम करणारे मखमलाबाद येथील चिंतामण उगलमुगले यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उगलमुगले हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून शिवसेनेचे काम करतात. प्रभागात रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आदी समस्या सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कोविड लसीकरणाबाबत नागरिकांना मदत केली. त्यांना यापूर्वी कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी `अनिस’चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र जाधव, वसंतराव वाघ, सलीम शेख, प्रदीप गांगुर्डे, वैशाली जाधव, राधा क्षीरसागर, टीकुभाई कोहली, रविभाऊ आहीरे आदी उपस्थित होते. रफिक सैय्यद यांनी सूत्रसंचालन केले.
—