पंचवटीत आजपासून निशुल्क अष्टांग योग साधना शिबीर

चिन्मय मिशनद्वारा आयोजन

0

नाशिक : प्रतिनिधी

येथील चिन्मय मिशनद्वारा अष्टांग योग साधना शिबीर सोमवारपासून (दि.22) सुरू होत आहे. १२ वर्षांवरील सर्व जण या शिबिरात भाग घेऊ शकतात. विकारमुक्त शरीर आणि मनाच्या एकाग्रतेसाठी या शिबिरात अभ्यास करवून घेतला जाईल. २७ नोव्हेंबरला शिबिराचा समारोप होईल. रोज सकाळी ७ ते ८ किंवा संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान हे शिबीर असेल.

   या वर्गाची वैशिष्ट्ये अशी :                                                                     यौगिक पध्दतीने आसने, सूर्यनमस्कार, ओंकार जप, प्राणायाम व योगनिद्रा. तसेच आता सुरू असलेल्या महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व मानसिक शांतीकरिता हा वर्ग प्रभावी असेल.

ठिकाण : चिन्मय आश्रम, चिंचबन, पंचवटी, नाशिक

संपर्क – जीवराम गावले : (मो.९८६००४२४२७ ) व संजय चौधरी : (मो. ९८९००२०१००)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.