नाशिक : प्रतिनिधी
मनुष्याने जीवनात भक्ती का करावी ? भक्ती केल्याने अंतःकरण शुद्ध होऊन शक्ती व शांती प्राप्त होते, असे निरुपण प. पू. स्वामी अद्वैतानंदजी यांनी केले.
चिन्मय मिशन, चिंचबन येथे आयोजित भागवद्गीतेच्या १२ व्या अध्यायाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
हा ज्ञानयज्ञ सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होत आहे. या ज्ञानयज्ञाचा लाभ जास्तीत जास्त साधकांनी घ्यावा, असे आवाहन चिन्मय मिशनचे सचिव जीवराम गावले यांनी केले आहे.
स्वामी अद्वैतानंदजी म्हणाले की, अध्यात्माची सांगड प्रत्येकाने घालावी. परमेश्वराचे नामस्मरण महत्त्वाचे आहे. मनःशांतीसाठी भक्ती अन् श्रद्धा यावर विश्वास ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
या ज्ञानयज्ञात प्रवीण देशपांडे, प्रमिला पाटील, संजय चौधरी, वृंदा राठी आदी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—