नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणारे निसर्ग विद्या निकेतन आणि अभिलाषा निसर्गोपचार केंद्राच्यावतीने प्रजासत्ताक दिन राजीवनगर येथे साजरा झाला. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी योग, आयुर्वेद व निसर्गोपचार ही आरोग्याची त्रिसूत्री घराघरात पोचविण्याची प्रतिज्ञा केली. तसेच या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या घरादाराचा राखरांगोळी केली. सर्वस्वाचे बलिदान दिले, त्यांना येथे नमन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. राज सिन्नरकर, डॉ. तस्मीना शेख, सुनीता पाटील, रणजीत पाटील, प्रा. तुषार विसपुते, प्रा. पुरुषोत्तम सावंत, प्रा. चैतन्य कुलकर्णी, वैशाली पाटील उपस्थित होते.
हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषींनी आपल्याला जी चिकित्सा पद्धती शिकवली, ती चिकित्सा पद्धती आम्ही संपूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. प्राकृतिक चिकित्सा म्हणजे `मिट्टी, पाणी, धूप, हवा; सब रोग की यही दवाʼ. आपल्याला औषधांशिवाय ही पंचमहाभूते बरे करू शकतील, हा प्राचीन ऋषींनी आपल्यामध्ये विश्वास निर्माण केला होता. मध्यंतरी तो लुप्त झाला होता. तो पुन्हा जागृत करू. योग, आयुर्वेद, निसर्गोपचार याला घराघरात घेऊन जाऊ. माणसांपर्यंत घेऊन जाऊ. त्याशिवाय माणसाचे जीवन सुखी, समृद्धी व प्रसन्न होणार नाही.
—