सीडीओ-मेरी शाळेचे पर्यवेक्षक व माजी कार्यवाह शशांक मदाने यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
प्रत्येक शिक्षकाने अध्ययन व अध्यापन करताना प्रत्येक विषयाचा अभ्यास सखोलपणे करावा. शासनाचे, शिक्षण विभागाचे व संस्थेचे नियम काळजीपूर्वक पाळणे, सांभाळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे संस्था, शाळा व स्वतःची सर्व दृष्टीने प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.


सीडीओ मेरी शाळेचे पर्यवेक्षक व माजी कार्यवाह शशांक मदाने यांच्या सेवापूर्ती समारंभात मार्गदर्शन करताना प्रा. राहाळकर बोलत होते. कार्यवाह राजेंद्र निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

     मान्यवरांच्या हस्ते स­रस्वती पूजन व क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र निकम यांनी मदाने यांच्या कार्याचा परिचय करून दिला. देवयानी मदाने, दिलीप अहिरे, पंढरीनाथ बिरारी, साहेबराव राठोड यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी मदाने यांचा संस्था व शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी प्रास्ताविक केले. यशश्री रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुनीता जोशी यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.