नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ – मेरी हायस्कूलमध्ये विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी उदघाटन केले.
यावेळी उपप्रमुख सुनीता जोशी, पर्यवेक्षक शशांक मदाने व केशव उगले, ज्येष्ठ शिक्षक अनिल पवार, कुंदन गवळी, सुनिता खैरनार तसेच सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
जोशी म्हणाल्या की, प्रत्येकाने संशोधन केले पाहिजे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. विविध प्रयोग करावेत आणि निरीक्षण करून विचार करीत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
ज्येष्ठ्य विज्ञान शिक्षिका संपदा शेंडगे यांनी सुक्ष्मजीवांमुळे होणारे आजार व त्यावरील उपाय यावर उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थी यश भामरे याने जंतांमूळे होणारे आजार व उपाय, तसेच विद्यार्थीनी प्रियंका पाटील हिने डासांमुळे होणारे आजार व उपाय यांची माहिती दिली. यावेळी डॉ. रुपाली पानसरे यांनी विविध सुक्ष्मजीवांमुळे होणारे आजार व त्यावरील आयुर्वेदातील उपाय याविषयी माहिती दिली. विद्यार्थीनी दामिनी वाघमारे हिने सूत्रसंचालन केले. तृप्ती उपासनी यांनी आभार मानले.
—