म्हसरूळ, (वा.)
क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक व सामाजिक कार्य केले तर आपल्या देशाची नक्कीच भरभराट होईल, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी केले.
सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये म. ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. त्यावेळी कुंदा जोशी बोलत होत्या. यावेळी प्रतिमा पूजन झाले. उपप्रमुख सुनीता जोशी, शशांक मदाने, दिलीप अहिरे, अनिल पवार, भारती भोये, श्वेता देशपांडे, शीला गायधनी, सुनीता वाईकर उपस्थित होते.
सुनीता जोशी यांनी प्रास्ताविक केले, दिलीप अहिरे, छाया गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नितीन जाधव, संजय मेहेरखांब, पंढरीनाथ बिरारी, राजेंद्र पारधी, कैलास पाटील, संजय आव्हाड, यशश्री रत्नपारखी आदी उपस्थित होते.
—