सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे दिवाळीचे फराळ वाटप

0

नाशिक : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ व कपड्यांचे कश्यपी धरणाजवळील शास्त्रीनगर येथील आदिवासी पाड्यावर जावून वाटप केले. या उपक्रमाचे हे 4 थे वर्ष होते.

म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक १ मधील आणि नाशिक शहरातील अनेक लोकांनी जुने, पण वापरातील कपडे जमा केले होते. तेच कपडे आणि फराळाच्या वस्तू गरजूंपर्यंत पोहचविल्या.

या उपक्रमास अविनाश लोखंडे, ज्योती भदाणे, प्रांजल भदाणे, पराग शिंदे, किरण वडजे, रोहित मोराडे, मोनु आहिरे, सुनिता पाटील, गगन कोकाटे यांनी मदत केली.

याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश कोकाटे, शिवमुद्रा फाऊंडेशनचे पराग शिंदे, आशिष आहिरे, सुमित जाधव, गौरव शिरोरे, विनय आहेर, सुशिल आहिरे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.