मूत्राशय (मुतखडा)
शरीरातील रक्तातील दूषित मल किडनीद्वारे गाळून मूत्र रूपात तो मूत्राशयात जमा होतो. त्यावेळी त्या दूषित मलातून खड्यांची निर्मिती होते व ते मूत्राशयात साचून राहतात.
लक्षणे
मूत्र त्यागाची इच्छा होऊनही मुत्र त्याग केले जात नाही. त्यामध्ये अडथळे निर्माण होतात व मुत्राला जबरदस्तीने मूत्राशयात कोंडून ठेवले जाते. मूत्राशय आणि किडनी यामध्ये रासायनिक क्रिया सुरू होते. व शरीरात उष्णता वाढते. मुत्र वाफ होऊन उडून जाण्यास प्रारंभ होतो. काही वेळात रक्तात मिसळून रक्त प्रदूषित बनवते व पुन्हा मुत्र रुपात मूत्राशयात आल्यास त्याचे कठीण खडे बनण्यास सुरूवात होते.
कारण
शरीर किंवा मूत्राशयात अस्वाभाविक रूपात आलेला वायू मूत्राशयात व त्या ठिकाणी जमा होणाऱ्या मुत्राला सुखावते व तप्त वायू मुळे मुत्र सुकून कठीण खड्यात त्याचे रूपांतर होते. व चुकीचा आहार विहार
योगोपचार
आसन- ताडासन, उत्कटासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन, पर्वतासन, वक्रासन, अर्धमच्छेंद्रासन, भुजंगासन, सर्पासन.
प्राणायाम- नाडी शोधन,
क्रिया – वमन, दंड, वस्त्र, शंख प्रक्षालन
प्रणव ओंकार
ध्यानधारणा
निसर्गोपचार– यात किडनी आणि मूत्राशयावर अधिक भार न पडणे यासाठी योग्य आहार. शरीराची आंतरिक सफाई महत्त्वाची आहे.
1. दोन-चार दिवस केवळ पाणी हे लिंबू किंवा संत्रा एकत्र करून घ्यावे.
2. रसदार फळे, गोड फळे आहारात असावी.
3. एनिमा घ्यावा. सकाळ-संध्याकाळ पोट साफ ठेवावे.
4. सकाळी झोपेतून उठताच अनाशापोटी गरम पाण्यात एक लिंबू पिळून रस प्यावा.
5. भोजनात दही, खजूर, नारळ, किंवा नीरा पाणी, दूध, खरबूज, टरबूज, गाजर, पिकलेली केळी, डाळ भात, मध, अंजीर घ्यावे.
(वरील चिकित्सा योग व निसर्गोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी.)
वर्ज– मांस, मटण, मासे, अंडी, मीठ, डाळ, मसाले, साखर, लोणचे, चटणी, अल्कोहोल, इत्यादी
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८