नाशिक : प्रतिनिधी
येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात शिवचरित्रकार व आदिवासी अभ्यासक भाऊसाहेब नेहरे लिखित `सह्याद्रीचा वाघ-आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यांच्या हस्ते झाले प्रकाशन
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद पाटील, स्वागताध्यक्ष शशीभाई उन्हवणे, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, संयोजक कॉम्रेड राजेंद्र देसले, संयोजक किशोर धमाले, ज्येष्ठ नेते गणेशभाई उन्हवणे, प्रसिद्ध गायिका सुषमादेवी, ज्येष्ठ्य साहित्यिक सहाराभाई वेळूणजकर, कॉम्रेड नितीन पगारे, आदर्श शिक्षिका व स्वराज्य परिवाराचा महिला प्रमुख रेखा नेहरे, लेखक भाऊसाहेब नेहरे, लोकलढ्याचे संजय पंचरस, प्रशांत पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उन्हवणे यांनी नेहरे यांच्या प्रबोधनात्मक व लेखनात्मक प्रवासाची स्तुती करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे केवळ आदिवासी क्रांतिकारक नसून सर्व बहुजन समाजाचे पराक्रमी आद्य क्रांतिकारक आहेत. त्यांचे जीवनचरित्र, पराक्रमाला या सह्याद्रीचा वाघ पुस्तकामुळे न्याय मिळाला आहे. त्यांची जयंती ही सर्व समाजबांधवांसाठी प्रेरणादायी आहे. याचे श्रेय लेखक भाऊसाहेब नेहरे यांना जाते. राघोजी भांगरे यांचे जीवनचरित्र त्यांच्या असंख्य व्याख्यानांमुळे गावागावात पोहोचले.
यावेळी रेखा नेहरे यांनी संयोजकांचे पुस्तक प्रकाशन केल्याबद्दल ऋण व्यक्त केले. याप्रसंगी नेहरे यांनी संमेलनाला महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य साहित्यिकांना `सह्याद्रीचा वाघ-आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे’ हे ऐतिहासिक पुस्तक भेट दिले.
—