नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (दि.2) आधाराश्रमातील कुमारीकांना दागिने भेट देण्यात येणार असल्याची माहिती या अकॅडेमीच्या प्रमुख सोनाली करंदीकर यांनी दिली. 12 वर्षाखालील मुलींना बांगड्या, बिंदी, छोटे हार किंवा असे कोणतेही दागिने भेट दिले जाणार आहेत. कुमारी हे देवी दुर्गेचे स्वरूप मानले जातात आणि भारतीय संस्कृतीत त्यांना दुर्गा देवी असल्याचा उपदेश केला जातो. या नवरात्रीत या वंचित मुलींच्या निरागस चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यांना त्यांच्या पालकांचे प्रेम आणि काळजी हवी आहे. ज्यांना किमान 100 रूपये किंवा इतर काही दान करण्याची इच्छा असेल, त्यांनी सोनाली करंदीकर ( मो. 98601 22468) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
—
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी नवरात्रोत्सवात आधाराश्रमातील कुमारीकांना भेटवस्तू देणार
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post