नाशिक : (प्रतिनिधी)
अनंत विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेन्द्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ (नाणीजधाम) अंतर्गत येथील पेठरोडवरील रामशेज किल्ल्याजवळील जगद्गुरु नरेन्द्रचार्यजी महाराज उपपीठ (उत्तर महाराष्ट्र) यांच्या सहकार्याने व जिल्हा सेवा समितीतंर्गत दिंडोरी तालुका सेवा समितीच्यावतीने दिंडोरी तालुक्यात रविवारी (दि.29) भक्त आनंद मेळावा झाला. अनंत श्री विभूषित श्री नरेंद्रचार्यजी महाराज तसेच पिठाचे उत्तर अधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम झाला.
सुरुवातीला पारंपारिक वाद्य संबळ वाजवून माऊलींचे आगमन झाले. त्यानंतर भजन करत माऊलींचे स्वागत केले. ललिता खोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तालुका सचिव राहुल मौले यांनी सूत्रसंचालन केले. तालुका निरीक्षक सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सेवा समितीमधून जिल्हा निरीक्षक संदीप खंडारे, जिल्हा महिला अध्यक्ष संगीता वाळके, जिल्हा सचिव जालिंदर थोरात, जिल्हा कर्नल संदीप कदम, जिल्हा युवा प्रमुख अर्चना गवळी, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख हिरामण वाघ आदी उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांपैकी जिल्हा निरीक्षक, महिला अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा कर्नल, जिल्हा युवा प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले . श्रद्धा भवर यांनी आभार मानले.
तालुका समितीवरील तालुका निरीक्षक सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष अमोल खोडे, महिला अध्यक्ष उषा दवंगे व तालुका समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, संग्राम सेना, महिला सेना, युवासेना, भक्त, साधक, शिष्य, आजी-माजी पदाधिकारी आदी ६५० ते ७०० भक्तगण उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी मिळून गोपालकाला केला. ज्येष्ठ, युवा, महिला यांनी मिळून विविध खेळांचा आनंद घेतला. शेवटी एक ते दीड तास पारंपारिक वाद्यावर नृत्याचा आनंद घेतला. खेळामधील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिला अध्यक्ष यांनी संगमनेर येथून दहा ते पंधरा नवीन युवा कार्यक्रमाला उपस्थित केले, त्या युवांचा सत्कार जिल्हा समितीमार्फत झाला. जिल्हा सचिव यांच्यामार्फत आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या आनंद मेळावा प्रसंगी तालुक्यातील महिलांनी रांगोळी काढली व माऊलींचे पायघडी फुलांनी सजवली. या सर्वांचे तालुका कमिटीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तालुक्यातील सर्व सेवा केंद्र व आरती केंद्रांचे अध्यक्ष, युवा सेना, महिला सेना, संग्राम सेना यांनी तालुक्यातून भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित केले. त्याबद्दल त्यांचे तालुका समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
—