नाशिक : प्रतिनिधी
येथील श्री महावीर एज्युकेशन सोसायटी- संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनीअरीग विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक बाजीराव शिरोळे यांना ओरियंटल विद्यापीठ, इंदोर येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ.बाजीराव शिरोळे यांनी डेटा कॉम्प्युटिंग इन क्लाऊड कॉम्प्युटिंग एन्व्हायर्मेंट या विषयावर सखोल संशोधन करून ओरियंटल विद्यापीठ, इंदोर येथे शोधप्रबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधप्रबंध मान्य करत, प्रा.बाजीराव शिरोळे यांस पीएचडी पदवी प्रदान केली आहे त्यांना ओरियंटल विद्यापीठातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील डॉ. एल. के. विश्वामित्र यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले.
आज संपूर्ण जगात, डेटा सुरक्षा आणि स्टोरेज मोठी समस्या आहे. या समस्यांमुळे ग्राहकांना संगणक प्रणालीशी संवाद साधणे कठीण होत आहे. त्याच बरोबर डेटा सुरक्षितता ही खूपच चिंतेची बाब आहे. ही गरज लक्षात घेता डॉ. बाजीराव शिरोळे यांनी डेटा एनक्रिप्शन धोरण लागू करून क्लाउडमधील डेटाचे संरक्षण करणे, तसेच क्लाऊडवरील डेटा एनक्रिप्शन करून सुरक्षितपणे संचयित कारण्याठी सक्षम प्रणाली, तसेच तंत्र या प्रकल्पात प्रस्तावित केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने विचार करता हे महत्वाचे पाऊल असून त्यांच्या संशोधनाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पामुळे डेटा ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे सर्वस्तराहून त्यांचे कौतुक होत आहे.
यशात यांचा मोलाचा वाटा
त्यांच्या यशामध्ये कुटुंबातील त्यांची अर्धांगीनी, आई – वडील, बहीण, भाऊ, मित्र तसेच महावीर संस्थेमधील सर्व कॉलेजेसचा मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यांनी केले अभिनंदन डॉ. बाजीराव शिरोळे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हरिश संघवी, कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयिका तसेच डीन डॉ.प्रियंका झंवर, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अमोल लोखंडे, प्रथम वर्ष विभागाचे समन्वयक प्रा. नवनाथ पाळदे, शिक्षक तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.