नाशिक : प्रतिनिधी
दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सेवाकुंज भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादिक मेमन आणि राजा नामक संशयीतांनी हा हल्ला केला. याप्रकरणी हरिष संजीव शेट्टी (रा. दत्तमंदिर, ना. रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेट्टी आणि महेंद्र म्हात्रे हे दोघे मित्र बुधवारी (दि.१७) सेवाकुंज भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मद्यपी संशयीत आणि तक्रारदार यांच्यात रात्री किरकोळ वाद झाला होता. यावेळी संशयीत तुम्हाला पाहून घेवू अशी दमदाटी करून निघून गेले होते. शेट्टी व म्हात्रे आपल्या दुचाकीने घराकडे परतत असतांना बुलेटवर आलेल्या संशयीतांनी मारूती मंदिराजवळ दोघा मित्रांची दुचाकी अडवित शेट्टी व म्हात्रे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त एकाने दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.
—
बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने केला हल्ला
Get real time updates directly on you device, subscribe now.
Next Post