म्हसरूळ, (वा.)
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा प्रदीर्घ काळानंतर सुरू झाल्या. सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. इयत्ता पहिली ते सातवी च्या वर्गांना सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यानुसार आठवले-जोशी बालविकास मंदिर, मेरी ही शाळा भरली.
शाळेचे प्रवेशद्वार व वर्ग रांगोळी, पाना-फुलांनी सजविले होते. विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प, मुखपट्टी (मास्क), खाऊ देऊन पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ध्वनीवर्धकावर `सनई व स्कूल चले हम’ हे गीत वाजवण्यात आले.
प्रवेशोत्सवाप्रसंगी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देऊन पालकांचे संमतीपत्र तपासून वर्गात प्रवेश देण्यात आला. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते.
या सोहळ्यास केंद्र क्रमांक 12 चे केंद्रप्रमुख संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांनी विद्यार्थ्यांना कोविड नियमाच्या आवश्यक सूचना देऊन शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद होता.
—–