नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मानवाधिकार दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संस्थापिका सुमन दत्ता होत्या.
संगीत शिक्षक संदीप थाटसिंगर यांनी रचलेले गीत इयत्ता आठवीच्या विद्यार्थांनी गायले. विद्यार्थी ऋग्वेद वाघ याने मानवी अधिकारांचे महत्त्व सांगितले. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी मयुरी भगत हिने स्वरचित कविता प्रस्तुत केली.