नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या सुळेवाडी रोड, मखमलाबाद येथील होरायझन अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी नर्सरी, ज्युनिअर, सीनियर या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी हास्य योगा घेण्यात आला.
इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार, तसेच इतर योगासने घेण्यात आली. स्वरा सचिन काकड या विद्यार्थिनीने सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करून ते त्यांच्याकडून करून घेतले. शिक्षिका माया खुळे, अश्विनी जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या प्रज्ञा शंकरदास यांनी योगा दिनाचे महत्त्व व योगाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
—