अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थांचे यश

0

नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बीए – बीएड व बीएस्सी-बीएड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील एकूण ९१ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

इलाईट क्लबची स्थापना

महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इलाईट क्लबची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक वर्गातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश इलाईट क्लब मध्ये केला जातो. यातंर्गत या विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर उंचावण्यासाठी विशेष व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग, तसेच सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मेन्टॉरिंग पद्धतीचा परिणामकारक वापर करण्यात येतो.

दिव्यांगी वाघ प्रथम
महाविद्यालयाच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणुन बीएस्सी – बीएड अभ्यासक्रमात दिव्यांगी वाघ हिने ९४.३८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. मॅग्डेलिन पारके हिने ९२.१३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, आयेशा शेख हिने ९०.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. आयुषी पुंज ८७. ८८ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, तर सिद्दी घोरपडे ८६.७५ टक्के गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले.

आर्या माळी प्रथम
तसेच बीए – बीएड अभ्यासक्रमात आर्या माळी हिने ८८.०५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. साक्षी कटपाल हिने ८६.२0 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर शबनम खान हिने ८४.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. संस्कृती तिवारी याने ७९.७ टक्के  गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, तर अतुल तुपे याने ७५.५0 टक्के गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले. वरील सर्व विद्यार्थी इलाईट क्लबचे सदस्य आहेत.

यांनी केले अभिनंदन 
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके व महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रवीणकुमार जाधव, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रेखा पाटील व स्मिता बोराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यांनी पाहिले परीक्षेचे कामकाज

तसेच श्वेता वराडे, नरेश सावंत, स्मिता कुलकर्णी व  लक्ष्मण राजपूत यांनी परीक्षेचे कामकाज बघितले, तर प्रिया कापडणे, भाग्यश्री उपासनी यांनी निकालाचे काम पूर्ण केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.