नाशिक : प्रतिनिधी
अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात नुकतेच प्रथम वर्ष बीए – बीएड आणि बीएस्सी-बीएड विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग आणि स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उद्बोधन वर्गाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके यांच्या मनोगताने झाली. त्यांनी शिक्षक हा एक समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक आहे. तसेच शिक्षक हे एक व्रत आहे, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
संस्थेबद्दल माहिती दिली
याप्रसंगी अशोका शिक्षण संस्थेबद्दल माहिती देण्यात आली. अशोका शिक्षण संस्थेतंर्गत किती महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयात कोणते अभ्यासक्रम आहेत याबद्दल माहिती देण्यात आली. अशोका शिक्षण संस्थेतंर्गत अशोका एकात्मिक बी. एड. महाविद्यालयात बीए – बी. एड. २००८ पासून आणि बीएस्सी-बीएड २०१२ पासून सुरु झाले असे सांगितले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्रशासक यांच्याबद्दल माहिती दिली.
व्हिजन, मिशन आणि पॉलिसी विशद
अशोका शिक्षण संस्थेने ठरविलेले व्हिजन, मिशन आणि पॉलिसी विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, समन्वयक आणि शिक्षकांबद्दल माहिती दिली. प्रथम वर्ष बीए – बीएड आणि बीएस्सी-बीएडच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषय, तसेच अंतर्गत व बाह्य गुणांविषयी माहिती देण्यात आली. तसेच अशोका महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या अभ्यासपूरक, अभ्यासेतर आणि इतर अभ्यासेतर उपक्रमांबद्दल माहिती दिली. महाविद्यालयासंदर्भात असणाऱ्या शिस्तीची नियमावली सांगून विद्याथी उपस्थितीची नियमावली देखील सांगण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांची माहिती महाविद्यालयातील शिक्षकांनी दिली.
प्रथम वर्ष बीए – बीएड आणि बीएस्सी-बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन आणि नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. तसेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे आयोजन केले होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध फेऱ्या झाल्या. प्रथम फेरीत विद्यार्थ्यांसाठी रॅम्पवॉकचे आयोजन केले होते. त्यानंतर द्वितीय फेरीत दोन मिनिटांचा वेळ देऊन विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रतिभा आणि कौशल्ये सादरीकरणाची संधी दिली. आणि तिसऱ्या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांना उपयोजित प्रकारच्या प्रश्नांचे एका मिनिटात उत्तर देऊन समयसूचकता दाखवावी असे सांगितले. प्रथम वर्षाच्या सहभागी विद्यार्थ्यांमधून मि. फ्रेशर म्हणून कक्षीक भवर आणि मिस. फ्रेशर म्हणून ध्वनी छाबय्या यांची निवड करण्यात अIली. विविध फेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून प्रा. सोनाली म्हरसाळे यांनी काम पहिले.
यांनी दिल्या शुभेच्छा
अशोका शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, अशोका शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी उद्बोधन वर्ग आणि स्वागत समारंभाबद्दल शुभेच्छा दिल्या. फिओना डेमेल्लो, साक्षी निकम व प्रियाकुमारी शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.
यांनी घेतली मेहनत
या कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अनिश नायर, रोहन भामरे, आयेशा शेख, ग्लोरिया मोझेस यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्राची चव्हाण आणि प्रा. नरेश सावंत यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. रेखा पाटील व प्रा. स्मिता बोराडे, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
—