नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च या महाविद्यालयाचे 70 स्वयंसेवक, तसेच महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत व २३ स्वच्छ्ता कर्मचारी यांच्यासोबत स्वच्छ अमृत महोत्सव या विषयावर सकाळी तीर्थक्षेत्र काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छ्ता लीग या शासनाच्या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. अशोका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा ठोके व डॉ. सरिता वर्मा, तसेच संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रिया कापडणे व एआयसीईएसआर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मोनाली काकडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाची सुरवात पंचप्रण, तसेच स्वच्छ्तेबाबत शपथ घेऊन झाली. यानंतर परिसरातील प्लास्टिक, तसेच घन कचऱ्याचे संकलन यावेळी स्वयंसेवकांनी केले.
—