नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारणीची बैठक द्वारका येथे विनोद भट यांच्या कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय सचिव राहुल येवला होते. नाशिक येथे डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या योगशिक्षक संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून योगाचार्य अशोक पाटील यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यांच्या नावाला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.
जिल्हा अध्यक्ष यु. के. अहिरे व गीता कुलकर्णी यांनी सभेचे संचालन केले. सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी रत्नपारखी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. तस्मिना शेख, वैशाली पाटील यांनी सहभाग घेतला. शर्मिला डोंगरे, अलका कुरणे, जिवराम गावले, किशोर भंडारी, माया बुरकुल, सीमा ठाकरे, वैशाली रामपूरकर, अंजली भालेराव, विठ्ठल पवार, पी. टी. पाटील आदी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी महिलादिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल दिपाली लामखेडे यांचा सत्कार करण्यात आला.
—