जैन एकता मंचच्या अध्यक्षपदी अर्चना जांगडा; सेक्रेटरीपदी आरती राका

0

नाशिक : प्रतिनिधी

जैन एकता मंचचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. २०२५ – २६ या कार्यकाळासाठी सीए अर्चना जांगडा यांची अध्यक्ष आणि आरती राका यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्राने झाली. संस्थापिका मंगला घिया यांनी २१व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या जैन एकता मंचाच्या वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले. मावळत्या अध्यक्षा प्रीती भळगट यांनी मागील वर्षभरातील कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा सादर केला. यानंतर, लीना, दर्शना आणि ग्रुपने याच थीमवर मनमोहक  नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
जैन एकता मंचच्या संपूर्ण कार्यकारिणीचा शपथविधी झाला. नूतन अध्यक्ष अर्चना जांगडा यांनी धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून मंचाचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला.महिलांच्या नृत्यगुणांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने नाच ग घुमा या ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महिलांनी महाकुंभ, मराठी संस्कृती, महिला सशक्तीकरण अशा विविध थीम्सवर अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या स्पर्धेचा निकाल असा :
त्रिशुलिन ग्रुप (प्रथम क्रमांक), संस्कृती महाराष्ट्राची ग्रुप (द्वितीय), स्पायार्म व फ्युजन राजपुताना ग्रुप (तृतीय).
या कार्यक्रमासाठी कोर हेड डॉ. लीना पिंचा, प्रोजेक्ट लीडर दर्शना सुराणा आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे परीक्षण मेघना राव यांनी केले. कार्यक्रमास जैन एकता मंचच्या सर्व पदाधिकारी आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.