नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बीए-बीएड व बीएस्सी-बीएड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ६१ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत झाले आहेत. त्यांनी महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इलाईट क्लबची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश इलाईट क्लब मध्ये केला जातो. यातंर्गत या विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर उंचावण्यासाठी विशेष व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग, तसेच सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मेन्टॉरिंग पद्धतीचा परिणामकारक वापर करण्यात येतो.
बीएससी-बीएडला नेहा दवंगे प्रथम
महाविद्यालयाच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणुन बीएससी-बीएड अभ्यासक्रमात नेहा दवंगे हिने ८९.८८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. समीक्षा शेलार हिने ८९. ६३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, शेख नाझ हिने ८८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मो.अझर याने ८७. ३८ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, तर ऋतुजा बोरसे हिने ८५. ८८ गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले.
बीए-बीएडला खुशबु सिंग प्रथम
बीए-बीएड अभ्यासक्रमात खुशबु सिंग हिने ७८.३० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. सीमा चौधरी हिने ७८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर सलोनी संधु हिने ७७. ६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विवेक श्रीवास्तव याने ७५.६० टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, तर पुजा कुमारी हिने ७०.३० टक्के गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले.
यांनी केले अभिनंदन
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्या डॉ.आशा ठोके व महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रवीणकुमार जाधव, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रेखा पाटील व स्मिता बोराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रिया कापडणे, प्राची चव्हाण, नरेश सावंत, स्मिता कुलकर्णी व लक्ष्मण राजपूत यांनी परीक्षेचे कामकाज बघितले. भाग्यश्री उपासनी, योगिता उफाडे, कविता पालवे आणि प्रियांका मोरवाल यांनी निकालाचे काम पूर्ण केले.
—
—