दोन महान संतांच्या महासमाधींचे वार्षिक स्मृती दिवस

0

संपूर्ण विश्वात गुरू-शिष्याच्या नात्यासमान दुसरे काहीच नसेल, जे आजही भारतामध्ये टिकून आहे आणि बहरते आहे. मानवांतील संबंध आणि प्रेमाचे इतर सर्व प्रकार कदाचित रक्ताच्या, प्रणयाच्या किंवा मैत्रीच्या नात्याने जोडलेले असतील, परंतु गुरू-शिष्याच्या नात्याचे स्वरूप हे आपल्या शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूच्या नि:स्वार्थ तळमळीवर आणि शिष्याच्या बिनशर्त, संपूर्ण प्रेममय समर्पणावर आधारित असल्यामुळे अनन्यसाधारणपणे भिन्न आहे.
एक संत आणि त्यांचा अग्रगण्य शिष्य यांच्यातील अनुकरणीय नाते आपल्याला स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरी आणि त्यांचे अद्वितीय शिष्य, श्री श्री परमहंस योगानंद यांच्या गौरवशाली उदाहरणातून पाहायला मिळते. श्री श्री परमहंस योगानंद हे “योगी कथामृत” (द ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी) या अभिजात आध्यात्मिक साहित्यातील सर्वकालीन आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. हे उत्कृष्ट पुस्तक, जी श्री युक्तेश्वरजींच्या प्रेमळ पण करड्या नजरेच्या तालमीत तयार केलेल्या वर्षांची निर्विवाद आणि प्रेरणादायी कथा आपल्यासमोर मांडते. ज्यामुळे साधक असलेला मुकुंदा बहरास येऊन जगद्गुरू किंवा वैश्विक गुरू योगानंदजी बनले.
या महान पुस्तकातील एक महत्वपूर्ण प्रकरण, “गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्षे,” श्री युक्तेश्वरजींच्या प्रशिक्षणाच्या निखळ गुणवत्तेवर प्रकाश टाकते, तसेच प्रारंभिक मानवसुलभ भय असतानाही, योगानंदजींची अविचल, अटळ ग्रहणक्षमता दिसून येते, ज्यायोगे अंतिमत: त्यांच्या गुरूंच्या इच्छेनुसार ते अमेरिकेस स्थलांतरित झाल्यानंतर पाश्चिमात्य जगात योगाचे जनक म्हणून उदयास आले.
योगानंदजींनी 1917मध्ये, योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)ची स्थापना केली आणि नंतर, अमेरिकेत तिचे प्रतिरूप सेल्फ-रीअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ), ही वायएसएसची जागतिक स्तरावरील सहयोगी संस्था स्थापन केली. या दोन संस्था योगानंदजींच्या यौगिक-ध्यानाच्या शिकवणींचा प्रसार करीत असतात आणि विश्वातील सर्व सार्थ आध्यात्मिक शिकवणींच्या एकात्मतेबरोबरच ईश्वराशी थेट संपर्क साधण्याच्या आवश्यकतेवर भर देतात. या शिकवणींचे शेकडो, हजारो साधक या सत्यतेची खात्री देतात की, सुरुवातीला त्यांनी आस्थेने या आध्यात्मिक मार्गावर वाटचाल सुरु केली तेव्हा त्यानंतर त्यांच्या जीवनाला स्पष्ट व निश्चितपणे चांगले वळण लागले आहे.
योगानंदजींच्या जीवनातील सुरुवातीच्या वर्षांतील अनेक घटना आणि श्री युक्तेश्वरजींच्या कठोर परंतु मूलत: प्रेमळ शिकवणी, यांचे “योगी कथामृत” मध्ये वर्णन करताना, तरुण विचारी योगानंदांची दैवी संपर्काची तीव्र आस आणि त्यांच्या गुरुंचा आपल्या शिष्याचे आयुष्य घासून तासून आध्यात्मिक नियमांनुसार उत्कृष्ट बनविण्याचा दृढ महान संकल्प विवेकी वाचकांसमोर आणला आहे. शिष्य आणि त्याचे गुरू यांच्यातील नाजूक, संवेदनशील, प्रेममय बंध आणि तदअनुषंगिक आवश्यक विवेक, क्षमा, आणि स्वर्गीय प्रेम हा या दोन उत्तुंग जीवनांचा खरा वारसा आहे. तो मानवजातीच्या उत्थानासाठी समर्पित होतो, जेव्हा  माया-भ्रमाची विनाशकारी शक्ती मानवजातीला भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी त्रिविध तापांमधून जाण्यास प्रवृत्त करते.
श्री युक्तेश्वरजी आणि योगानंदजी (परमगुरू लाहिरी महाशय आणि महावतार बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली) यांनी सर्वोच्च वैज्ञानिक ध्यानाचे तंत्र, क्रियायोग ही या जगाला अर्पण केलेली कालातीत विश्वव्यापी देणगी आहे, जी अनेक सहस्त्रावधी वर्षे दूर लोटली जाऊन कालौघात चिरडली गेली होती.
श्री योगानंदजींचा  महासमाधी दिवस 7 मार्चला आहे आणि श्री युक्तेश्वरजींचा 9 मार्चला आहे. या तारखा जवळजवळ असणे हे सुद्धा त्यांना जोडणाऱ्या शाश्वत बंधनाचे सूचक आहेत. आणि त्यांचे जीवन व्यापून टाकणारा सर्वांत अमूल्य गुण आहे, त्यांचे ईश्वरावरील प्रेम. असे प्रेम जे आपल्यापैकी प्रत्येकाने विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिक माहिती : yssi.org

लेखक: विवेक अत्रे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.