नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणारे निसर्ग विद्या निकेतन आणि अभिलाषा निसर्गोपचार केंद्राच्या द्वितीय ओपीडीची सुरुवात राजीवनगर येथे झाली. या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी व पाहणी करण्यासाठी नाशिकचे प्रथम नागरिक, महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी नुकतीच सदीच्छा भेट दिली. महापौर या केंद्रात सुमारे १ तास थांबले व भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. महापौरांनी या आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती करून घेतली.
याप्रसंगी प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते, डॉ. तस्मीना शेख, सुनीता पाटील, प्रा. पुरुषोत्तम सावंत, रणजीत पाटील, गौरी राजोळे, वैशाली पाटील, आयुर्वेदाचार्य व इंदिरानगरमधील पतंजली चिकित्सा केंद्र व माॅलचे संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा.चैतन्य कुलकर्णी, अखिल भारतीय योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम अहिरे व योगतज्ज्ञ अशोक पाटील उपस्थित होते.
मिट्टी, पानी, धूप, हवा
सब रोगोंकी यही दवा
या सिद्धांतानुसार मी बरा होऊ शकतो…
डॉ. तस्मीना शेख व प्रा. तुषार विसपुते यांनी विविध निसर्गोपचारांची प्रात्यक्षिके दाखवली व माहिती दिली.
याप्रसंगी डॉ. तस्मीना शेख म्हणाल्या की फक्त काही अत्यावश्यक परिस्थितीमध्ये आम्ही आयुर्वेद व होमिओपॅथी डॉक्टरांच्या सहाय्याने औषधांची मदत घेतो. संस्थेतर्फे तळेगाव अंजनेरी येथे व राजीवनगर, नाशिक येथे अशा दोन शाखा चालविल्या जातात. जेथे माती उपचार (मड थेरपी), ॲक्युप्रेशर थेरपी, चुंबकीय चिकित्सा (मॅग्नेटो थेरपी), जलोपचार (हायड्रो थेरपी), ॲक्युपंक्चर थेरपी, पंचकर्म या सर्व चिकित्सांचा आवश्यकतेनुसार रुग्णांवरील उपचारात समावेश केला जातो.
संस्थेतर्फे नाशिकपासून १८ किलोमीटरवर सुमारे 5.5 एकर जागा घेऊन तेथे निसर्ग विद्या निकेतन तर्फे आश्रम व छोटीशी गोशाळा उभारण्यात येत आहे.
भविष्यात योग व प्राकृतिक चिकित्सेच्या क्षेत्रात असंख्य भरीव उपक्रम राबविण्याचा मानस याप्रसंगी तज्ज्ञांनी व्यक्त केला व भारतीय ऋषिंनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्प केला –
सर्वांच्या मनात निश्चय रुजलेला आहे की…
अभी तो ये पहेली उडान है…
और आसमां बाकी है…
—