नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या शंभर विद्यार्थीनींचा नृत्याविष्कार

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम संस्थेचे २० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यालीच्या १०० विद्यार्थिनींनी आपली भरतनाट्यम कला प्रेक्षकांसमोर सादर करत त्यांचे मन जिंकले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

२००३ मध्ये स्थापन झालेल्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जणाऱ्या नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या दोन्ही शाखा म्हणजे ईगल स्पोर्टस क्लब, नाशिकरोड आणि भावसार भवन, गोविंदनगर, येथील शिष्यांनी सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात भरतनाट्यममधील प्रारंभिक अडवू, अलारीपू, जतिस्वरम आणि वर्णम सारख्या पारंपरिक रचना सादर केल्या. ज्येष्ठ शिष्यांनी गणेश स्तोत्र आणि महिषासुरमर्दिनी सादर केले.

                            गुरू सोनाली करंदीकर 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात खास अधिकमास माहात्म्य दर्शविणारे, विठ्ठलाच्या नाम घोषात दंग करून टाकणारे आणि नामस्मरण घडवणारे असे राम कृष्ण हरी धून, सुंदर ते ध्यान, रखुमाई, सावळे सुंदर, तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, खेळ मांडियेला आणि माऊली माऊली हे सुंदर अभंग सादर केले आणि नुकत्याच झालेल्या वारीचा गजर केला.
विशेष उल्लेख म्हणजे नृत्यलीच्या महिला रत्नांनी केलेलं सादरीकरण. घरची कामं सांभाळत, संसाराची कर्तव्य पार पाडत आपल्या लहानपणीच्या इच्छा पूर्ण करायला, गुरू सोनालीताईंच्या प्रोत्साहनाने अगदी १५ दिवसात शिकून त्यांनी २ सुंदर अभंग सादर केले व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले.
आपल्या पाल्ल्याची प्रगती बघताना पालकही भारवून गेले होते. हे स्नेहसमेलन, गुरू सोनालीताईंच्या मार्गदर्शनाखाली झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.