म्हसरूळ, (वा.)
स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्यातर्फे उद्या (दि. 2) नववर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर होणार असल्याची माहीती उपमहानगर समन्वयक प्रमुख डाॅ. पंकज वाल्हेकर यांनी दिली.
स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्यातर्फे उद्या (दि. 2) नववर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर होणार असल्याची माहीती उपमहानगर समन्वयक प्रमुख डाॅ. पंकज वाल्हेकर यांनी दिली.
हे शिबीर स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक, साईबाबा मंदिरासमोर, म्हसरूळ, दिंडोरी रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान होणार आहे. गेल्या २ वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक तरुण व तसेच वयस्कर व्यक्तीमध्ये अचानक शुगर व बीपीचा त्रास सुरु झाला असून त्या अनुषंगाने हे शिबीर होत आहे.
या शिबिरात होणाऱ्या तपासण्या अशा : रक्तातील साखर प्रमाण, रक्तदाब तपासणी, पायातील नसांची तपासणी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण. सर्व वयातील लोक या तपासणी शिबिराचा लाभ घेऊ शकतात, असेही डाॅ. वाल्हेकर यांनी सांगितले.
—
—