नाशिक : प्रतिनिधी
स्वराज्य परिवाराच्यावतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 116 वी जयंती म्हसरूळ येथे विविध उपक्रमांनी साजरी झाली. याप्रसंगी स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष व शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांचे मार्गदर्शन लाभले.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन परिवाराचे सचिव विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष वाल्मीक शिंदे, महिला प्रमुख रेखा नेहरे, समाजसेविका जयश्री जाधव, ज्योती गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
याप्रसंगी कोरोना काळात म्हसरूळ परिसरात कार्यरत कोरोना योद्ध्यांचा सन्मान भाऊसाहेब नेहरे व मोहिनी भगरे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार्थींमध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. जी. हळदे, पोलीस नाईक योगेश रहेरे, पोलीस शिपाई दिनेश गुंबाडे, प्रशांत देवरे, महिला पोलीस मनीषा मल्लाह यांचा समावेश होता.
—