नाशिक : प्रतिनिधी
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. प्राथमिक शिक्षण मोफत देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी केले.
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी दरेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यांची उपस्थिती
व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चैताली गिते यांनी सूत्रसंचालन केले. वारुंगसे यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक दरेकर म्हणाले, की भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे. ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला. मौलाना आझाद यांना आझाद या नावानेही ओळखले जाते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देखील सहभाग घेतला होता.