म्हसरूळ, (वा.)
कोरोना महामारीच्या जवळ-जवळ 20 महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर इयत्ता 5 वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी सीडीओ-मेरी हायस्कूलमध्ये प्रवेश केला. शासनाच्या आदेशानुसार कोरोना त्रिसूत्रीचे पालन करीत आणि अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, कार्यवाह राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
चिमुकल्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन जंगी स्वागत करण्यात आले. यासाठी गुरुजन आणि शालेय प्रशासनाने शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. जेथे-जेथे विद्यार्थ्यांचा स्पर्श होईल, अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच शाळेचे प्रवेशद्वार तोरणाने सुशोभित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका कुंदा जोशी, उपमुख्याध्यापिका सुनिता जोशी, पर्यवेक्षक केशव उगले, पालक- शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष किरण काकड, राजेश मुळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य साहेबराव राठोड, कुंदन गवळी आणि इतर गुरुजन उपस्थित होते.
—
—