नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शर्वरी काकड, अक्षरा पिंगळे, समृद्धी पिंगळे या विद्यार्थ्यांनी या दिनानिमित्त आपले मनोगत सादर करून व्हिडिओ पाठविले. प्राचार्य सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.
—