सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन

0

नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (दि. ७ डिसेंबर)  भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिनाचे औचित्य साधून मूल्यवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जवानांविषयी कृतज्ञता व सन्मान

देशासाठी लढणाऱ्या, वेळप्रसंगी जिवाची बाजी लावणाऱ्या भारतीय भूदल, नौदल, वायुदल येथे कार्यरत सर्व जवानांविषयी कृतज्ञता व सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला. युद्धात जखमी जवानांचे पुनर्वसन व कल्याण, तसेच शहिदांच्या पत्नी व मुलांसाठी या दिवशी भारतीय जनतेकडून निधी गोळा करण्यात येतो. वीरमरण पत्करलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, असे इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच निधी जमा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाल निळा व गडद निळा अशा या रंगांचा छोटा ध्वज देण्यात येतो.

जवानांना सहकार्य करण्याचा संकल्प

समाजशास्त्राच्या शिक्षिकांनी भारतीय ध्वजदिनाचा इतिहास व ध्वजाचे महत्त्व पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना समजावले. विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्य रुजवण्याचा हेतूने या शाळेत विविध मूल्यवर्धक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनीदेखील आम्ही सर्व भारताचे जबाबदार नागरिक म्हणून या उदात्त कार्यासाठी जवानांना सहकार्य करू, असा संकल्प केला व या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.