नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कृषी शिक्षण संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांना मुंबई येथील वंदे भारत विकास फाउंडेशनचा यावर्षीचा वंदे कृषी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
याप्रसंगी वंदे विकास फाउंडेशनचे प्रसाद कुलकर्णी, शिवाजी फुलसुंदर, डाॅ. रमेश मडव, दीपक विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वंदे किसान कृषी सन्मान पुरस्कार स्वीकारताना मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कृषी शिक्षण संचालक डाॅ. सूर्या गुंजाळ. समवेत माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, प्रसाद कुलकर्णी.