नाशिक : प्रतिनिधी
प्रत्येक शिक्षकाने अध्ययन व अध्यापन करताना प्रत्येक विषयाचा अभ्यास सखोलपणे करावा. शासनाचे, शिक्षण विभागाचे व संस्थेचे नियम काळजीपूर्वक पाळणे, सांभाळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे संस्था, शाळा व स्वतःची सर्व दृष्टीने प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.
सीडीओ मेरी शाळेचे पर्यवेक्षक व माजी कार्यवाह शशांक मदाने यांच्या सेवापूर्ती समारंभात मार्गदर्शन करताना प्रा. राहाळकर बोलत होते. कार्यवाह राजेंद्र निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी प्रास्ताविक केले. यशश्री रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुनीता जोशी यांनी आभार मानले.
—