म्हसरूळ, (वा.)
म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पुष्पकनगर येथे महिलांसाठी हळदी – कुंकू व सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा झाला. ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या हा उपक्रम राबविला आहे.
पुष्पकनगरमधील ज्येष्ठ्य नागरिक गउबाई हरी साळवे यांच्या हस्ते या कॅमेर्याचे लोकार्पण करण्यात आले. पुष्पकनगरमधील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी पुष्पकनगरमधील मूलभूत समस्या नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून मांडण्यात आल्या.
– गणेश पेलमहाले, राष्ट्रवादी काँग्रेस