नाशिक : प्रतिनिधी
कै. मनोहर उपाख्य आप्पासाहेब भगवंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला. या स्पर्धेत नाशिक शहरातील 36 शाळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत एकूण 347 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भोसला मिलिटरी स्कूलचे कार्यवाह तथा सॅमसोनाईट साउथ एशिया प्रा. लि. चे उपसंचालक मिलिंद वैद्य, तर अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी होते. संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर, संस्थेचे कार्यवाह अनिल कुरवीनकोप, विश्वस्त राजेंद्र सराफ, सुधीर पाटील, कार्यकारणी सदस्या रोहिणी कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष शशांक इखणकर, स्पर्धेचे प्रमुख म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम महाजन, स्पर्धेच्या कार्यवाह भारती ठाकरे आदी उपस्थित होते. कौटकर यांनी पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. मीनल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
—
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक एक ( इयत्ता पहिली ते चौथी) : प्रथम क्रमांक – गायत्री नारायण इंझे (आठवले – जोशी बाल विकास मंदिर, मेरी), द्वितीय – नावीन्या महेश कदम. ( सीडीओ मेरी स्कूल, इंग्रजी माध्यम), तृतीय – वैदिक स्वरा पराग खराटे (शिशुविहार व बालक मंदिर), उत्तेजनार्थ – शौर्य राहुल मोकळ (शिशुविहार व बालक मंदिर), साईराज प्रभाकर सापनर (नवभारत विद्यालय, पंचवटी).
– गट क्रमांक दोन (इयत्ता पाचवी ते सातवी) : प्रथम – सोहम मुक्ताजी पवार (वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर), द्वितीय – इच्छा अन्ना चव्हाण (बालशिक्षण मंदिर गोरेराम लेन), तृतीय – समीक्षा प्रवीण वराडे (बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन), उत्तेजनार्थ – साहस प्रमोद खैरनार (बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन), उत्कर्ष अनिल उगलमुगले (के. के. वाघ इंग्रजी स्कूल ).
गट क्रमांक तीन ( इयत्ता आठवी ते 10वी ) : प्रथम – विवेक रघुराई कारूस (लोकमान्य विद्यालय, नाशिक), द्वितीय – श्रेया मनीष वराडे (के. के. वाघ इंग्रजी स्कूल ), तृतीय – सोहम घनश्याम मोरे (मराठा हायस्कूल), उत्तेजनार्थ – स्वरा सचिन मालपुरे (सीडीओ मेरी हायस्कूल), आदिती विजेंद्र गायकवाड (मराठा हायस्कूल.)
—