भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांचा एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार – 2023 ने गौरव

पालकही सन्मानित

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांना एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार – 2023 ने गौरविण्यात आले आहे. एकलव्य आर्ट फाउंडेशनने डोंबिवली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. मुंबई दूरदर्शनमध्ये वर्ष 2023 साठी नुकत्याच झालेल्या ऑडिशन्समध्ये गरिमा या, बी ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच गरिमाचे पालक राजेशकुमार चव्हाण व आरती चव्हाण यांनाही एकलव्य आदर्श पालक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे.
गरिमा यांनी अलीकडेच गरिमा’स नृत्यनाद स्कूल ऑफ डान्स ही भरतनाट्यम प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली आहे. तिच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचा प्रसार व प्रेम निर्माण करणे आणि समाजामध्ये भारतीय सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गरिमा यांनी वयाच्या चौथ्या वर्षी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. बी. टेक (मेकॅनिकल) पदवी प्राप्त केल्यानंतर, गरिमा यांनी आपली नृत्याची आवड करिअर म्हणून निवडली. गुरु पवित्र कृष्ण भट आणि गुरु अपर्णा शास्त्री- भट (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.
गरिमा यांना केंद्र सरकारकडून 2011 मध्ये सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग (सीसीआरटी) या भरतनाट्यमच्या शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे. त्या केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या वंदे भारतम नृत्य उत्सवाची विजेती आहे. त्या 26 जानेवारी २०२२ च्या प्रजासत्ताक दिन संचलनातही सहभागी होत्या.

त्यांच्या इतर कामगिरीमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या जी 20 शेर्पा मीटिंग आणि पेरूरमध्ये कोईम्बतूरच्या रोटरी क्लबद्वारे आयोजित २५व्या नाट्यांजली नृत्य महोत्सवाचाही समावेश आहे.  गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये इंडियन कौन्सिल फाॅर कल्चरल रिलेशन्सद्वारे प्रायोजित आझादी का अमृत महोत्सवचा भाग म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत गरिमा यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.